⚡देवगड ता.३१-: देवगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद साटम यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आज राजीनामा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मिलिंद साटम हे गेली दहा वर्ष शिवसेना तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. मात्र आता वरचेवर आपली तब्येत बरी नसल्यामुळे व घरगुती कारणामुळे मी माझ्या तालुकाप्रमुख या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. माझ्या दहा वर्षाच्या कालावधीत वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांनी मला मोलाचे सहकार्य दिले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार देखील व्यक्त केले आहे.
यापुढे आपण समाजकार्यात सक्रिय राहणार असल्याचेही यावेळी साटम यांनी सागितले.
उबाठा शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांचा राजीनामा…
