बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव…!

⚡बांदा ता.३१-:
बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 आहे रोजी माघी गणेश जयंती* उत्सवाचेे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.शनिवारी पहाटे ५.०० वाजता-काकड आरती, अभिषेक व पुजा ,सकाळी ८.00 वाजता-श्री गणेश पूजा,
सकाळी ९.०० वाजता-श्री सत्यनारायण महापुजा,दुपारी १.०० वाजता-महाआरती व महाप्रसाद
सायंकाळी ४.३० वाजता – सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम ,तर सायंकाळी ६.३० वाजता-सायं आरती होईल.रात्रौ ८.०० वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कोळंब, मालवण यांचा सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तसेच
रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८.००वा.दत्त प्रासादिक भजन मंडळ मुबंई (भांडूप) बुवा भगवान लोकरे
आणि लिंग माऊली प्रसादिक भजन मंडळ सांताक्रुज मुंबई बुवा श्रीधर मुणगेकर यांच्यात पारंपारिक डबलबारीचा जंगी सामना होणार आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page