Headlines

मधुकर सीताराम भुर्के विद्यालयाच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे थाटात भूमिपूजन…!

⚡वैभववाडी ता.३०-: कोंकण विद्या प्रसारक मंडळ(मुंबई) संचलित मांगवली येथील मधुकर सीताराम भुर्के विद्यालयाच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन पार पडले. संस्थेचे अध्यक्ष श्रीधर राणे व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते नुतन वास्तूचा शुभारंभ करण्यात आला.
इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला सरपंच शिवाजी नाटेकर, संस्थेचे सचिव अनंत राणे, उपाध्यक्ष सतीश जागुष्टे, महेश संसारे, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, शाळा समिती अध्यक्ष सखाराम राणे, विठ्ठल राणे, मुख्याध्यापक एस. डी. पाटील, पोलिस पाटील कमलाकर लिंगायत, नंदकुमार राणे, राजेंद्र राणे, वसंत नाटेकर, मंगेश कोलते, शरद कांबळे, गावातील ग्रामस्थ तसेच मौदे, उपळेतील पालक उपस्थित होते.
शासनाच्या नियोजित नवीन शैक्षणिक संकुल धोरणानुसार नव्या इमारतीचा आराखडा असून आठ वर्गखोल्या, संस्था कार्यालय, मुख्याध्यापक व शिक्षकांना स्वतंत्र दालन, प्रशस्त प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालय अशा १४ खोल्या व प्रशस्त सभागृह अशी नव्या शैक्षणिक संकुलाची रचना असणार आहे.
शालेय अभ्यासक्रमासोबतच शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा संस्थेचा मानस असल्याने त्यादृष्टीने इमारतीचा आराखडा बनविण्यात आला आहे. विद्यार्थी पटसंख्या दरवर्षी घटत असताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच या विद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे मांगवलीतील मधुकर भुर्के विद्यालयाकडे पंचक्रोशीतील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील संस्थेच्या योजनांचा विचार करुन नवीन शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे.
फोटो: मांगवली येथील मधुकर सीताराम भुर्के विद्यालयाच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन संस्थाध्यक्ष श्रीधर राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page