म्हापसाहून सुटलेल्या बसचा कोलवाळ येथे अपघात

एक ठार तर आठ जण गंभीर जखमी

बांदा : प्रतिनिधी म्हापसा येथून प्रवाशांना घेऊन पत्रादेवी येथे जाणारी पत्रादेवी-पेडणे-म्हापसा बस व कंटेनर यांच्यात मुंबई-गोवा मार्गावरील कोलवाळ बिनानी येथे समोरासमोर अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्रकार अमोल नाईक व गौरेश पटेकर हे त्याचदरम्यान जात असताना केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आपण वाचल्याचे त्यांनी सांगितले. अपघातातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदतकार्य केले. संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पेडणे-पत्रादेवी-म्हापसा ही खाजगी बस कोलवाळ बिनानी येथे पोहोचली असता समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. बसमधील जखमी प्रवाशांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळची वेळ असल्याने बस प्रवाशांनी भरली होती.

You cannot copy content of this page