⚡मालवण ता.२७-:
शिवसेना नेते धर्मवीर स्व. आनंद दिघे यांची जयंती मालवण शिवसेना (शिंदे गट) शाखेमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना कुडाळ मालवण जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, तालुका प्रमुख आशा वळपी, उपतालुकाप्रमुख पराग खोत, गिता नाटेकर, उदय गावडे, प्रदीप मोरजे, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, वैभव गोवेकर, दाजीबा कुबल, शामसुंदर मेस्त्री, क्रांती धुरी, तालुका समन्वयक कविता मोंडकर, कृष्णा चव्हाण, भालचंद्र कुबल, विक्रम परब, रुपाली जुवाटकर, हरी खवणेकर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.
