स्मशानभूमीसाठीच्या भूखंडाची तातडीने मोजणी होणार:अधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्यांना पत्र ; रणजित देसाई यांचा पुढाकार..
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालागतच्या नेरुर -वाघचौडी वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमीसाठी मागणी करत असलेला संबंधित भूखंड तातडीने मोजणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे पत्र एमआयडीसीच्या वतीने देण्यात आल्याने या ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी कुडाळ येथील एमआयडीसी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण आणि आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.
कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालागतच्या नेरुर -वाघचौडी वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. नेरूर-वाघचौडी आणि गोंधयाळे वाडी भागातील सुमारे दीडहजार लोकांसाठी हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे दुखणे आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षात २० हुन जास्त उपोषणे या मागणीसाठी त्यांनी केली. पण एमआयडीसी प्रशासनाकडून कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळेच येत्या कालच्या प्रजासत्ताक दिनी कुडाळ एमआयडीसी कार्यालसमोर हे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते. या उपोषणाला बऱ्याच मंडळींनी पाठींबा दिला. काही राजकीय मंडळींनी पण या मागणीला समर्थन दिले. या दरम्यान नेरूर विभागाचे जिल्हा परिषद सदस्य भाजप गटनेते रणजित देसाई यांनी सकाळ पासून सर्व अधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला आणि या विषयावर सकारात्मक चर्चा केली. त्यांनी संबंधित रत्नागिरीचे अधिकारी क्षेत्र व्यवस्थापक यांना अनेक प्रश्न करून अनुत्तरीत केले. व धारेवर धरले. पण कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळालेले नाही . त्यानंतर रणजित देसाई यांनी या विषयाबाबत गांभीर्याने घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद साधला व त्या चर्चेत सर्व प्रकल्प शेतकऱ्यांची भेट करून सर्व विषय सविस्तर त्यांच्यासमोर मांडू असे ग्रामस्थांना आश्वासित केले. .
हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याच्या आधारे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही रणजित देसाई यांनी दिली .त्यावर एमआयडीसीचे रत्नागिरी क्षेत्र व्यवस्थापक, व भूमापक यांनी संबंधित भूखंड तातडीने मोजणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे पत्र दिले. त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी हे आमरण उपोषण व परिणामी आत्मदहन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले.
या उपोषणाला रणजित देसाई यांच्यासह बंड्या सावंत, संजय वेंगुर्लेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी श्याम गावडे, मंगेश राऊत, अजित मार्गी, जयराम परब, महेश राणे, कृष्णा मार्गी, धाकू गावडे, सुरेश गावडे, महेश धोंड, प्रभाकर देसाई, निलेश गव्हाणकर, लक्ष्मण लोके, ऋषिकेश गावडे, मनीष कलिंगण, महेश परब, जितेंद्र गावडे, भास्कर नाईक, शुभम गावडे, शंकर गावडे, सत्यविजय चीपकर, शिवाजी लाड, सुनील धुरी, प्रल्हाद गावकर, महादेव मार्गी, प्रभाकर गावडे आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
