बांद्यात हस्ताक्षर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.२७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात शालेय मुलांसाठी अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

वाचनालयच्या नाडकर्णी सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यासाठी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर, अंकुश माजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सदर स्पर्धा इयत्ता दुसरी ते चौथी व इयत्ता पाचवी ते सातवी या दोन गटात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ७४ विद्यार्थी-विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी शिक्षक, पालक तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित साहित्यिक प्र. श्री नेरुरकर जयंती सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.

You cannot copy content of this page