राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश…!

⚡मालवण ता.२५-:
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मालवण तहसीलदार कार्यालयातर्फे आयोजित विविध स्पर्धामध्ये मालवणच्या भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा- प्रथम क्रमांक- सृष्टी अनिल सरमळकर (१२वी वाणिज्य), द्वितीय क्रमांक-पार्थ साईनाथ मेस्त्री (१२वी कला ), तृतीय क्रमांक- हीना दीपक म्हापणकर (११वी विज्ञान). निबंध स्पर्धा- प्रथम क्रमांक- प्रणया सुभाष मांजरेकर (१२ वी कला), द्वितीय क्रमांक- सिया गणेश पेडणेकर (१२वी वाणिज्य), तृतीय क्रमांक- वनश्री बाबुराव यादव (१२वी वाणिज्य). वक्तृत्व स्पर्धा- प्रथम क्रमांक- सौरवी गंगाराम देसुरकर(११ वी विज्ञान) या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांना मालवणात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी, शेवाळे कुडाळ मालवण प्रांताधिकारी ऐश्वर्या काळशे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे नायब तहसीलदार नागेश शिंदे, संतोष लुडबे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री याने ३ से मी × १. ५ सेमी तुळशीच्या पानावर विठ्ठलाची रांगोळी साकारात आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदवल्याबद्दल जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते पार्थ याचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page