खनिज प्रकल्प विरोधी नाणोस वासियांना पालकमंत्री नितेश राणेकडून दिलासा…

विरोध असेल तर प्रकल्प होणार नाही;सकारात्मक आश्वासनानंतर उद्याचे उपोषण मागे..

⚡सावंतवाडी ता.२५-: गावातील लोकांना खनिज प्रकल्प नको असेल तर तो होणार नाही असे सांगून नाणोस येथे सुरू असलेले भू सर्वेक्षण थांबविण्या बाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून दया असे आदेश सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी खनिकर्म विभागाला दिले आहे.
या पार्श्वभूमीवर नाणोसवासियांनी आज येथे पत्रकार परिषद आयोजित करून पालकमंत्र्यांचे आभार मानले.त्यांनी दिलेल्या शब्द आम्हाला मान्य आहे त्यामुळे उद्या होणारे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत असे मायनिंग संघर्ष उपसमितीचे अध्यक्ष सागर नाणोसकर यांनी सांगितले
नाणोस येथे काही स्थानिक जमीनदारांना हाताशी धरून त्या ठिकाणी खनिज कंपनीच्या माध्यमातून अनधिकृत भू सर्वेक्षण करण्याचे काम गेले काही दिवस सुरू आहे याबाबत ग्रामस्थांनी विरोधात भूमिका घेतली आहे आम्हाला विश्वासात न घेता हे भू सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी आमचा विरोध आहे तसेच पुढच्या काळात आम्ही त्या ठिकाणी खनिज प्रकल्प होऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे
या सर्वेक्षणाच्या विरोधात ग्रामस्थांनी 26 जानेवारीला उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना सिंधुदुर्गनगरी येथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधला
यावेळी ग्रामस्थांकडून गावाची भूमिका मांडण्यात आली त्या ठिकाणी ग्रामसभा व मासिक सभा घेऊन त्या ठिकाणी होणाऱ्या भू सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे तसेच काही झाले तरी आम्हाला हा प्रकल्प गावात नको अशी भूमिका त्यांनी मांडली आहे गावातील लोकांची मागणी लक्षात घेता श्री राणे यांनी खनिकर्म अधिकारी चैताली सावंत यांना याबाबत पुनर्विचार करण्यात यावा जर गावातील लोकांचा या प्रकल्पाला विरोध तर तसा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत दरम्यान या सूचनेनंतर नाणोस ग्रामस्थांनी पालकमंत्री राणे यांचे आभार मानले आहे
आज येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली पालकमंत्र्यांनी शब्द दिला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे आम्ही उद्याचे आंदोलन नाही घेत आहोत असा अशी भूमिका तरी मांडली. तसेच आपल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतचे आम्ही आभारी आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी माजी सरपंच वासुदेव जोशी ग्रामपंचायत सदस्य विनायक शेटये,अंकुश शेट्ये,सुधाकर नाणोसकर,दाजी शेटये आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page