ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
*💫सावंतवाडी दि.२०-:* कोरोनावर लस तयार करणारे कारखाने महाराष्ट्र नसल्याने, त्यावर केंद्र सरकारचे पूर्णपणे नियंत्रण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त असताना देखील महाराष्ट्राला कमी प्रमाणात लसीचा पुरवठा केला गेला असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केला आहे. या कठीण काळात देखील केंद्र सरकार पश्चिम बंगाल येथे प्रचारात व्यस्त आहेत. यावेळी केंद्राने कठीण काळात राजकारण न करता एकमेकाच्या सहकार्याने काम करणे गरजेचे आहे. असे मत त्यानी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, कोरोनची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यसरकार योग्य तो निर्णय घेईल असा शब्दात राज्यात लॉक डाऊन लागू शकते असा इशारा पण दिला आहे.
