महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइजचा फेडरेशनचा बँक खाजगीकरणला विरोध..

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीर पाठीबा; बँक खाजगीकरण विरोधी जन अभियान सुरु

*💫सावंतवाडी दि.२०-:* ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्यावतीनं संघटनेच्या ७६ व्या वर्धापनदिनाच औचित्य साधत २० एप्रिल पासून बँक खासगीकरण विरोधी जन अभियान राबविण्यात येत आहे. या जन अभियानाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व व्यापार सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांनी पाठिंबा देत बँकांच्या खाजगीकरणाला विरोध दर्शविला. यावेळी जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी, नाही कार्पोरेटच्या लुटीसाठी असा नारा देत महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरशननं बॅंक खाजगीकरणाचा विरोध केला. यावेळी महाराष्ट्र बँकचे माधवी शिरसाठ, वैभव सावंत,सदानंद कुणकेरकर,विक्रांत केनवडेकर, अरूण वाडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page