कांदळगावच्या रामेश्वर मंदिराचा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा २४ रोजी…

⚡मालवण ता.१२-:
मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा २३ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रामेश्वर भक्तनिवास कांदळगाव येथे श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालय विश्वस्थ मंडळ, कांदळगाव तसेच आरोग्य उपकेंद्र कांदळगाव आणि शिल्पा खोत मित्र मंडळ सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून लघुरुद्र, त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती व दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने होणार आहेत. तर रात्रौ १० वा. ग्रामदेवता पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ बिडवाडी ता. कणकवली यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी कलशारोहण वर्धापन दिन सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळ राणे परब, मानकरी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page