नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

⚡बांदा ता.१२-: येथील नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, खजिनदार भूषण सावंत, अभिजित पोरे, तुषार परब, श्री शेटकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, कर्मचारी अमिता परब आदी उपस्थित होते.
यावेळी एस आर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर विचार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page