देवगड तालुक्यात स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणार…

देवगड पंचायत समिती गट विकास अधिकारी वृक्षाली यादव यांची माहिती..

देवगड (प्रतिनिधी)

        देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात १ जानेवारी ते २० जानेवारी या काळात " स्वच्छ माझे आंगण " हे अभियान राबविण्यात येणार आहे . देवगड तालुक्यातील सर्व कटूंबांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी  देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे . 
             देवगडमध्ये हे अभियान प्रभावीपणे व्हावे यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा  सभेत विशेष नियोजन करण्यात आले . यावेळी अधिक्षक कुणाल मांजरेकर , कृषी विस्तार अधिकारी विलास कोलते  विस्तार अधिकारी कृषी लक्ष्मीकांत जोशी ,विस्तार अधिकारी आरोग्य प्रतिमा वळंजु , विस्तार अधिकारी आरोग्य  गंगुताई अडुळकर, कनिष्ठ अभियंता दिपक मयेकर आदी अधिकारी उपस्थित होते .
           प्रत्येक कटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण व पुर्नवापर , कंपोष्ट खत तयार करणे , परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनसाठी , शोषखड्डा व पाझर खड्डांचा वापर करणे हे या अभियानाचे उदिष्ट्य आहे . या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांना श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे . 

या अभियान अंमलबजावणी कालावधी टप्पे या प्रमाणे असणार आहेत.अभियानाचा कालावधी १ ते २० जानेवारी २०२५, अभियान पडताळणी कालावधी २१ ते २४ जानेवारी पर्यंत आहे. तर पात्र कटूंबांना लेखी स्वरूपात निमंत्रण -२५ जानेवारी पर्यंत दिले जाईल व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अभियानातील पात्र कुटुंबांचा
प्रशस्तीपत्र देत सन्मान केला जाईल.
या अभियानात महिलाबचत गटांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी केले आहे .

You cannot copy content of this page