मालवण पोलिसांची कारवाई
मालवण (प्रतिनिधी) मसुरे भोगलेवाडी तिठा येथील सचिन धामापूरकर याच्या घरामागील मांगरात पोलिसांनी छापा टाकून ७,२०० रुपयांची गोवा बनवटीची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मसुरे भोगलेवाडी तिठा येथे गोवा बनावटीची दारूचा साठा असल्याची माहिती मालवण पोलिसांना मिळताच त्यांनी त्याठिकाणी धाड टाकली. या कारवाईत ७,२०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. पोलीस कर्मचारी नाईक, विवेक फरांदे, हरिश्चंद्र जायभाय यांनी ही कारवाई केली.
