निलेश राणे:यापुढे समुद्रात अवैधरित्या मासेमारी करण्यास येणाऱ्या मलपीतील एकाही ट्रॉलरला परत जाऊ देणार नाही …
⚡मालवण ता.०८-: परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांमध्ये जी भीती निर्माण करणे गरजेचे होती ती कशी होईल. त्यासाठीच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून जी ताकद दाखवण्याची गरज होती ती दाखविली. त्यामुळेच जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मलपीतील ट्रॉलर्स पकडण्याची कार्यवाही मत्स्यव्यवसाय खात्याकडून झाली. यातून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला. बोटीवर बसून फोटोसेशन करणे मलाही शक्य होते पण केवळ शो बाजी करून मच्छीमारांचे प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव मला झाली म्हणून सभागृहातही मी पहिला प्रश्न मच्छीमारा संदर्भात उपस्थित केला असा कोणाचेही नाव न घेता टोला लगावत मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी यापुढे येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करण्यास येणाऱ्या मलपीतील एकाही ट्रॉलरला परत जाऊ देणार नाही असा इशारा श्री. राणे यांनी यावेळी दिला.
मालवण येथील निलरत्न या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले,
बहुचर्चित सी वर्ल्ड प्रकल्प संदर्भात स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतरच मार्ग काढू. स्थानिक लोकांबरोबर बसून त्यांच्याशी चर्चा करून एक आमसभा घेऊन त्यांच्यातून भावना तयार झाली त्यांनी मान्यता दिल्यास आणि पुढाकार घेण्यास सांगितले तरच पुढील निर्णय घेतला जाईल आणि हा विषय शासन दरबारी मांडला जाईल असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्री. राणे पुढे म्हणाले तोंडवळी, देवबाग येथील बंधाऱ्याचे काम काही तांत्रिक बाबीमुळे अडकले आहे. ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचे काम करून या बंधाऱ्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार येत्या काळात या बंधाऱ्यांची कामे मार्गी लागतील. जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे आपण जनतेचे काही देणे लागतो. या भावनेतून येत्या काळात काही नवीन संकल्पना आपण मांडणार आहोत. काही नवीन प्रकल्प, रस्ते, रिंग रोड यांसारखी कामे मार्गी लागायला हवी होती. मात्र हे का झालं नाही यावर आता मी चर्चा करणार नाही. मला कोणावरही टीका करायची नाही. मला लोकांनी संधी दिली आहे. त्यामुळे या संधीचे सोने करायचे आहे तशीच पावलं मी टाकत आहे.
घोटगे सोनवडे घाट रस्त्यासाठी अनेक डीपीआर तयार करण्यात आले. नारायण राणे ज्यावेळी पालकमंत्री होते. त्यावेळी हा डीपीआर बनवण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी बनविलेल्या डीपीआर बाबत गेल्या दहा वर्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. या खात्याचे मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात अनेक बैठका घेतल्या. जो डिपीआर लवकरात लवकर मंजूर होईल. पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. यांचा विचार करून बनविण्यात आला. त्यानुसार पर्यावरण विभागाची कमिटी काल येऊन गेली आऊंगा त्या कमिटीने सर्व शहानिशा केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सर्वगौड उपस्थित होते. त्यामुळे घोटगे सोनवडे घाट रस्त्याचा शुभारंभ लवकरात लवकर करण्यात येणार आहे असेही आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
