बॅ. नाथ पै पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे १५ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा…

⚡मालवण ता.०८-:
बॅ. नाथ पै यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे दि. १५ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय (इयत्ता ८वी ते १२वी ) व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी शालेय गट- इयत्ता आठवी ते बारावीसाठी विषय: बॅ. नाथ पै आणि कोकणचा विकास, सामान्य जनतेचे कैवारी बॅ. नाथ पै, राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका, वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज तर खुला गट -विषय: वसुधैव कुटुम्बकम आजच्या जगाची गरज, लोकनेते -बॅ. नाथ पै, विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्ये रुजविणे काळाची गरज, महिला सुरक्षा- चिंता व चिंतन असे विषय देण्यात आले आहेत.

विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व क्रमांक प्राप्त स्पर्धेकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमांमध्ये दिले जातील. एका शाळेतील फक्त दोन विद्यार्थी सहभागी करून घेतले जातील. स्पर्धकानी १४ जानेवारी पर्यंत आपली नावे प्रा. अरुण मर्गज- ९४२३३०२८५९, प्रा परेश धावडे- ९४२०८२२८७८, चित्रा कुंटे- ८५५०९२२८५५, प्रा. मंदार जोशी- ९४०५२९१५८९ यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page