रांगणा तुळसुलीतील अतिदुर्गम शाळेला रोटरी कडून संगणक संच…

कदमवाडी शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार:ग्रामीण भागातील शाळेला भेट देणे हि रोटरीची सेवा आहे;अध्यक्ष डाॅ संजय केसरे..

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम जि.प.प्रा.शाळा रांगणातुळसुली कदमवाडी शाळेला रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून संगणक संच प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळेला भेट देण्याचे भाग्य मिळणे हिच खरी रोटरीची सेवा आहे असे मत रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी व्यक्त केले.
यावेळी रांगणातुळसुली सरपंच नागेश आईर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे माजी अध्यक्ष राजन बोभाटे,दिनेश आजगावकर, सचिन मदने, ग्रा.पं.सदस्या सौ जयश्री कोळेकर, ज्येष्ठ नागरिक महादेव सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम सावंत, उपाध्यक्ष अरविंद सावंत, अंगणवाडीसेविका व मदतनिस, ग्रामस्थ, पालक,मुख्याध्यापक राजेश गुरव, सहशिक्षक प्रसाद मेस्त्री आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ सारखी आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था विविध समाजपयोगी उपक्रम राबवते, गोरगरीब लोकांना सुविधा उपलब्ध करून देते हे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सरपंच नागेश आईर यांनी व्यक्त केले.रोटरी सारखी सेवाभावी संस्था काय काम करते हे ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना समजणे आवश्यक आहे यासाठीच ग्रामीण भागात सेवा देणे हा मुख्य उद्देश असल्याचे रोटरी सेवा प्रतिष्ठान कूडाळचे राजन बोभाटे यांनी व्यक्त केले.
रांगणातुळसुली शाळेच्यावतीने सरपंच नागेश आईर यांच्याहस्ते रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रांगणातुळसुली कदमवाडी शाळेचा समूहगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून मुख्याध्यापक राजेश गुरव, सहशिक्षक प्रसाद मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश गुरव तर आभार सहशिक्षक प्रसाद मेस्त्री यांनी केले.

You cannot copy content of this page