बॅ. नाथ पै यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

शालेय आणि खुल्या गटात १५ जानेवारीला होणार स्पर्धा:बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे आयोजन..

⚡कुडाळ ता.०५-: बॅ. नाथ पै यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय (इयत्ता ८ वी ते १२वी ) व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे करण्यात आले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. तर १८ जानेवारीला बॅ नाथ पै यांच्या पुण्यतिथी दिवशी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
समाजवादाचे अग्रदूत, लोकशाहीचे कैवारी, वक्ता दशसहस्त्रेषु ही बिरुदावली मिळविलेले बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक व खुल्या स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे. बॅ. नाथ पै हे लोकशाही समाजवादाचे अग्रदूत म्हणून नावारूपास आले. त्यांच्याजवळ असणारा एक दुर्मिळ ठेवा म्हणजे आपल्या अमोघवाणीतून तळागाळातील लोकांना आपलेसे करणे व लोकांच्या न्याय हक्कासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संसदेत मुद्देसूद भाषण करणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या व अनेक आदर्श गुणांचा तरुण पिढीला परिचय व्हावा. यासाठी दरवर्षी बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करते. स्वर्गीय बॅ. नाथ पै यांच्या वक्तृत्व शैलीला विनम्र अभिवादन करण्यासाठी हि स्पर्धा घेतली जाते.
हि स्पर्धा शालेय आणि खुला अशा दोन गटात घेतली जाणार आहे. शालेय गटासाठी विषय (इयल्ता आठवी ते बारावी) –
शालेय गट- इयत्ता आठवी ते बारावीसाठी विषय – बॅ. नाथ पै आणि कोकणचा विकास, सामान्य जनतेचे कैवारी बॅ. नाथ पै, राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका, वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज. तर खुल्या गटासाठी विषय – वसुधैव कुटुम्बकम आजच्या जगाची गरज, लोकनेते -बॅ. नाथ पै, विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्ये रुजविणे काळाची गरज, महिला सुरक्षा -चिंता व चिंतन.
या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे पारितोषिके:आहेत. खुला गट -प्रथम क्रमांक रु ५,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रु ३,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रु २,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ रु १,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह . शालेय गट – प्रथम क्रमांक रु ४,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रु ३,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रु २,५०० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ रु १,००० व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह.
स्पर्धेचे नियम व अटी – स्पर्धा मराठी माध्यमातून होईल, प्रत्येक स्पर्धकास निवडलेल्या विषयावर बोलण्यासाठी सात(५+२) मिनिटे वेळ दिला जाईल, स्पर्धकांसाठी चहा व दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजका मार्फत करण्यात येईल, सर्व क्रमांक प्राप्त स्पर्धेकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र १८ जानेवारी २०२५रोजी सकाळी १०:०० वाजता होणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमांमध्ये दिले जातील, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, शाळेतील विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे, एका शाळेतील फक्त दोन विद्यार्थी सहभागी करून घेतले जातील, स्पर्धकानी १४ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत आपली नावे खालील स्पर्धा समितीकडे नोंदवावीत, सदर स्पर्था १५ जानेवारी२०२५ रोजी सकाळी दहा वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ एमआयडीसी येथे घेण्यात येईल.
स्पर्धेत नाव नोंदणी साठी किंवा अधीक माहिती घेण्यासाठी प्रा अरुण मर्गज (९४२३३०२८५९), प्रा परेश धावडे (९४२०८२२८७८), चित्रा कुंटे (८५५०९२२८५५), प्रा. मंदार जोशी (९४०५२९१५८९) साधावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकानी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page