⚡कुडाळ ता.०५-: पोलिस पाटील सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलिसांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस पाटील सेवा संघ सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सचिव सतिश माडये, तालुका अध्यक्ष वैभव धुरी, सुरेश नाईक, सौ.सुवर्णा म्हाडदळकर,सौ. स्नेहा मुंगारे,सौ.सदफ खूल्ली, सुरजित गावडे तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, गणेश कऱ्हाडकर, संजय कदम, सारिका बांदेकर,.प्रीतम कदम, रुपेश सारंग, श्री. झारापकर, सौ.रेडकर आदी उपस्थित होते.
पोलीस पाटील सेवा संघाकडून पोलिसांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा…
