संबंधितांची पोलिसात धाव;चौघांच्या विरोधात तक्रार,गुन्हा दाखल करण्याची मागणी..
सावंतवाडी ता
साटेली येथे उत्खनन करणाऱ्या मायनिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी साटेली गावचे विद्यमान उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगावकर सरपंचांचे पती लक्ष्मण नाईक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाईक या तिघांना वाटेत अडवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे
याप्रकरणी संबंधितांनी आपल्या पत्नीसह ग्रामस्थांना घेवून पोलीस ठाण्यात धाव घेतली असून धमकी देणा-या चौघांची विरोधात पोलिसात तक्रार दिली आम्ही प्रशासकीय स्तरावर तक्रारी करत असल्यामुळे हा प्रकार घडल्याच आहे त्यांचा आरोप आहे त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की साटेली येथे गेली वीसहून अधिक वर्षे एका कंपनीचे लीज आहे त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात उत्खनन झाले होते ते पुन्हा बंद पडले होते मात्र काही दिवसापूर्वी हे उत्खलन पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत यासाठी कोणतीही प्रशासकीय व ग्रामसभेची परवानगी घेण्यात आलेली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यामुळे गावात कंपनीच्या व उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात रोष आहे दरम्यान या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २ जानेवारीला साटेली मुख्य रस्त्यावर असलेल्या उभ्या असलेल्या सर उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोळगावकर सरपंचांचे पती लक्ष्मण नाईक आणि सदस्य संभाजी नाईक यांना वाटेत अडवून आमच्या विषयात तुम्ही पडायचे नाही आमच्या विरोध तक्रारी करायची नाहीत अन्यथा तुम्हाला ठार मारू अशी त्यांनी धमकी दिली.
दरम्यान या प्रकाराच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे झालेला हा प्रकार हा योग्य नाही याबाबत आम्ही प्रशासकीय स्तरावर दाद मागणे कायम चालू ठेवणार आहे कारण त्या ठिकाणी अनधिकृत मायनिंग सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थांसह त्यांच्या पत्नींनी सावंतवाडी पोलीस अधिकारी संजय कातिवले यांना निवेदन दिले असून त्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी उदय कळंगुटकर सचिन कळंगुटकर भरत मांजरेकर क्षमिका नाईक,साक्षी कोरगावकर,भावना मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधिकारी कातिविले यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले तसेच ज्या प्रकरणाचे आपण सखोल चौकशी करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले
