बांदा स्टॅन्डसमोरील महामार्गलागत असलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटवला…

⚡बांदा ता.०४-: बांदा स्टॅन्डसमोरील महामार्गलागत असलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटविण्यात आला. ‘ग्लोबल’च्या वृत्ताची दखल घेत बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी कचरा उचलण्याच्या सूचना महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्यात.
गेले कित्येक दिवस याठिकाणी कचऱ्याचा ढिगारा रस्त्याच्या लगतच ठेवण्यात आला होता. याचा त्रास वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना होत होता. तसेच हा कचऱ्याचा ढिगारा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत होता.
‘ग्लोबल’ न्युज चॅनेलने याबाबत सविस्तर वृत्त प्रसारित करताच याची दखल घेत महामार्ग विभागाने तात्काळ जेसीबी च्या साह्याने हा कचऱ्याचा ढिगारा हलविला. यामुळे वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page