टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन..
⚡मालवण ता.०२-:
मालवणची सुकन्या आणि मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कुलची माजी विद्यार्थिनी कुमारी सानिका कांचन सुदेश आचरेकर हिने अमेरिका अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली आहे. कु. सानिका ही मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेविका सौ. कांचन (स्नेहा) आचरेकर यांची सुकन्या आहे. सानिका सध्या अमेरिका कॅलिफोर्निया मध्ये कार्यरत असून तिने आपल्याला डेटा सायन्स, एआय मध्ये स्वारस्य असल्याचे सांगून या क्षेत्रात करियर करणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. कु. सानिका हिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेकांनी सानिका हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेविका कांचन (स्नेहा) आचरेकर यांची कन्या असलेल्या कु सानिका हीचे शालेय शिक्षण मालवण रोझरी इंग्लिश स्कूल येथे झाले. तर १२ वीपर्यंतचे शिक्षण डीजी रुपारेल कॉलेज ऑफ सायन्स व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले.
सद्याच्या युगात युवावर्गात डेटा सायन्स, एआय मधेच स्वारस्य आहे. म्हणून माहिती प्रणाली डेटा, एआय, व्यवस्थापनासाठी डेटा, एआय मॅनेजमेंटसाठी डेटा निवडतात. त्यानुसार कुमारी सानिका हिने इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. याविषयी बोलताना कु सानिका हिने
एआय बऱ्याच मॅन्युअल गोष्टी घेत आहे, प्रत्येक गोष्ट डेटा आहे, आपण जे काही बोलता ते आपल्या फोनद्वारे संग्रहित केले जाते. त्याला डेटा म्हणतात. या डेटाला साफसफाईची आणि व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. वाचण्यास सोपे तसेच वापरकर्ता साठी अनुकूल असे अहवाल प्रदान करणे हे माझे काम आहे. हे क्षेत्र भविष्य आहे जग जसजसे वाढत जाईल तसतसे तंत्रज्ञान अधिक वेगाने वाढेल. असे सांगून सानिका हिने पप्पा हे माझे ढाल आहेत, त्यांनी प्रत्येक पावलावर नेहमीच खंबीरता आणि साथ दिली. सोबतच हा प्रवास आई शिवाय शक्यच नसता. कारण आईंची दृष्टी असणे अत्यावश्यक आहे. माझ्या आईंची दूरदृष्टी, त्याग, समर्पण आणि अखंड मार्गदर्शन यामुळे मला या प्रवासात मदत झाली. भाऊ ओमने मला संयम आणि प्रत्येक परिस्थितीत शांत कसे राहायचे हे शिकवले. शाळेने मला खूप काही शिकवले आहे आणि मला एक चांगली व्यक्ती बनवले. माझे सर्व शिक्षक यांचे मिळालेले मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वाचे ठरले आहे. हे केवळ माझेच यश नाही तर प्रत्येक मालवणकराचे यश आहे. “कष्ट करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका” असेही सानिका यांनी यां निमित्ताने सांगितले.
