कणकवली कॉलेज स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे…

प्रवीण सुलोकार यांनी दिले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण..

⚡कणकवली ता.०२-: कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित निवासी विशेष संस्कार शिबिर मध्ये सर्व स्वयंसेवकांना श्री. प्रवीण सुलोकार यांनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीप्रसंगी कोणती काळजी घ्यावी, स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याबाबत प्रशिक्षण दिले. आग, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांची मदत कशी करावी. रस्ता दुर्घटना, हृदयविकाराचा धक्का, विषबाधा सारख्या मानवनिर्मित आपत्तीमध्ये मदत कशी करावी. याबाबत ही प्रशिक्षण देण्यात आले.
प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सुरेश पाटील, कार्यक्रमाधिकारी, प्रा. सागर गावडे, प्रा. आदिती मालपेकर, प्रा. पूजा मुंज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उजेफा नवलेकर यांनी केले तर आभार रती खोत यांनी मांडले. सदर दिवशी शिबिराच्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त स्वयंसेवक व उपस्थित नागरिकांचे उपजिल्हा रुग्णालय कणकवली, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग कणकवली कॉलेज कणकवली, आणि महालॅब जिल्हा रुग्णालय ओरस यांचे मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातून श्री. सुशील परब, कीर्ती पवार, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग कणकवली कॉलेज, कणकवली तर्फे प्रा. गीतांजली सापळे, श्री. समीर तावडे आणि तृतीय वर्ष वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज महालिंगे, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page