पाडलोस – केणीवाडा रस्त्याचे काम सुरू..

⚡बांदा ता.०१-: अनेक वर्षे डांबरीकरण करण्याची मागणी असलेल्या पाडलोस – केणीवाडा येथील अंतर्गत रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली. माजी आमदार राजन तेली यांच्या विशेष प्रयत्नातून सदर काम मार्गी लागल्याचे शिवसेना (ठाकरे) पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल यांनी सांगितले.
पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांच्या हस्ते पाडलोस – केणीवाडा अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, ग्रा. पं. सदस्य विनायक परब, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब, ग्रामस्थ मनोहर परब, मयुरी कुबल, एकनाथ नाईक, बाबू पटेकर, शशिकांत नाईक, सप्रेम परब, अमोल नाईक, आर्यन केणी, ज्ञानेश्वर नाईक, सिद्धेश कोरगावकर आदी ग्रामस्थ व ठेकेदार उपस्थित होते.

You cannot copy content of this page