सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे २ जानेवारीपासून शिबीर…!

⚡मालवण ता.३१-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सात दिवसांचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर नांगरभाटवाडी- साळेल येथे दि. २ ते ८ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.

या शिबिराचे उदघाटन गुरुवार, दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर कुशे, संचालक विजय केनवडेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साळेल ग्रामपंचायत सरपंच रविंद्र साळकर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच लक्ष्मण परब, पं. स. माजी सदस्य कमलाकर गावडे, ग्रामसेविका सौ. स्वरा परब, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी आदी व इतर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत बौद्धिक चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ३ रोजी व्यक्तिमत्व विकास – वक्ते : प्रफुल्ल वालावलकर (गटविकास अधिकारी पंचायत समिती, मालवण), दि. ४ रोजी संवेदनशील कोकण- वक्ते : प्रा. हसन खान (रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवण), दि. ५ रोजी स्वास्थ्य रक्षणाकरीता आयुर्वेद- वक्ते : डॉ. नूतन सोनू गावडे (B.A.M.S., M.D.) (संचालक, श्री विश्वमांगल्य आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मालवण), दि. ६ रोजी सुखी जीवनाची गुरुकिल्ली- वक्ते : मेजर डॉ. एस. व्ही. गीरसागर माजी प्राचार्य, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय) दि. ७ रोजी जलसाक्षरता काळाची गरज – वक्तेः डॉ. सोमनाथ कदम (इतिहास विभाग प्रमुख, कणकवली कॉलेज) अशी चर्चासत्रे होणार आहेत. शिबिराचा समारोप दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर व सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे कॉलेज विकास समिती अध्यक्ष अॅड. समीर गवाणकर यांच्या प्रमुख उपास्थितीत होणार आहे. तरी या शिबिरास भेट देऊन शिबिरार्थीना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page