उड्डाण पुलाच्या कामामुळे आला होता काढण्यात..
बांदा ता.३१-: येथील मुंबई-गोवा महामार्गावर गेली कित्येक वर्षे झळकणारा बांदा शहराचे प्रतीक असलेला व उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आलेला ध्वज आज सर्वपक्षीय तसेच समस्त बांदावासीय यांनी एकत्र येत पुनर्स्थापित केला. या ध्वजाचे आज सर्वांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
बांदा शहर हे कायमच त्याच्या एकीसाठी जिल्ह्यात आदर्श असून आज पुन्हा एकदा याचे दर्शन बांदावासीयांनी दाखवले. जुन्या मुंबई गोवा महामार्गावर स्थापित करण्यात आलेला भगवा ध्वज नियोजित उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आला होता. उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने समस्त बांदावासीय तसेच विशेष म्हणजे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत तो पुनर्स्थापित केला. यावेळी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजस्तंभाची पूजा करून विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी माजी सैनिक निलेश सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, महेश सारंग, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सरपंच प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, वरिष्ठ पदाधिकारी सिद्धेश पावसकर, बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, शिवसेना शिंदे गट विभाग प्रमुख राजेश विरनोडकर, शिवसेना उभाठा गट शहर प्रमुख साई काणेकर, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष संदेश पावसकर, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर तसेच मिलिंद परब, हेमंत दाभोळकर, मंदार केसरकर, केदार कणबर्गी, जय सावंत, सौरभ आगलावे, स्वागत नाटेकर, अक्षय बांदेकर, सनी बांदेकर, भाई म्हाडगुत, साईराज पावसकर, सुनील नाटेकर, शैलेश केसरकर, सागर सावंत, नितेश पेडणेकर, गुरुनाथ नार्वेकर यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :-
बांदा येथे ध्वज अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले बांदावासीय. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
