⚡मालवण ता.३१-: मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या एका ख्यातनाम माजी विद्यार्थ्याला स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपट व हायस्कूलच्या दोन कर्तबगार माजी विद्यार्थ्यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र वितरित करण्याचा सोहळा गुरूवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहे.
यामध्ये माजी विद्यार्थी डॉ. विजय हरिश्चंद्र नारिंग्रेकर यांना ताम्रपट प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तर सौ. सुरेखा नितीन वाळके आणि लेफ्टनंट कर्नल स्वप्निल लक्ष्मण केरीपाळे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद महादेव परूळेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी विजय कामत आणि टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी केले आहे.
