⚡बांदा ता.३१-: भाजपच्या पक्षीय धोरणनुसार बांदा शहर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा सरपंच प्रियांका नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी वर्षभराच्या आपल्या कारकिर्दीत शहराच्या अनेक विकासकामात योगदान दिले.
बांदा शहर ग्रामपंचायतवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. पक्षाच्या धोरणनुसार पाच वर्षात पाच जणांना उपसरपंचपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. सुरुवातीला जावेद खतीब यांना उपसरपंचपद देण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हि धुरा बाळु सावंत यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांची मुदत आज ३१ डिसेंबर रोजी संपल्याने त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा सरपंच श्रीमती नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.
श्री सावंत यांनी शहराच्या विविध विकासकामात योगदान दिले आहे. त्यांच्या कालावधीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना याठिकाणी भरघोस मताधिक्य मिळवून दिले. गोवर्धन कचरा प्रकल्पत देखील त्यांचे योगदान आहे.
उपसरपंचपदाची माळ आबा धारगळकर यांच्या गळ्यात
शहरात भाजपाची एकहाती सत्ता असल्याने पाच वर्षात पाच जणांना उपसरपंचपद देण्यात येणार आहे. श्री सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शहरातील प्रभाग क्रमांक एकचे सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
फोटो :-
बाळु सावंत
भाजपच्या पक्षीय धोरणनुसार बांदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाराम बाळु सावंत यांचा राजीनामा…!
