विद्यार्थ्यांना गणवेश तात्काळ द्या अन्यथा जनआंदोलन…

शिक्षक समितीचा जनआंदोलनात एल्गार: पं.स.समोर शिक्षक समितीचे लाक्षणिक आंदोलन..

⚡कुडाळ ता.३०-: विद्यार्थ्यांना गणवेश तात्काळ द्या अन्यथा शिक्षक समिती जनआंदोलन उभारेल असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. आज सायंकाळी कुडाळ पं.स.समोर संचमान्यता जाचक आदेश रद्द करा, ऑनलाईन सुविधा शाळांना पुरविल्याशिवाय कामाची सक्ति करू नये अशा ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान या पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषदेसमोर आंदोलन आणि तरीही प्रश्न नाही सुटले तर राज्यव्यपी आंदोलन उभारले जाईल असा इशारा राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष शशांक आटक, सचिव महेश गावडे, राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर, जिल्हा पदाधिकारी अजय तांबे, संदिप गोसावी, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, शिक्षक नेते प्रसाद वारंग, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, सल्लागार चंद्रकांत अणावकर, कुडाळ प्रवक्ता संतोष वारंग, पतपेढी अध्यक्ष विजय सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा कदम, सेवानिवृत्त शिक्षक अनंत गावकर, प्रविण वेटे, नरेश खरात व निवृत्त केंद्रप्रमुख धोंडू रेडकर, जिल्हा पदाधिकारी आपा सावंत, कुडाळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा संजना पेडणेकर, सचिव सुगंधा अणावकर, महिला आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, जिल्हा पदाधिकारी गोपाळ गावडे, नरेंद्र बावलेकर, संगिता राऊळ, भार्गवी कापडी, जिल्हा पदाधिकारी निलेश ठाकूर, ईश्वरलाल कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ येथील शिक्षक समितीच्या आंदोलनास जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हासरचिटणीस तुषार आरोसकर यांनी भेट देत विद्यार्थ्यांना गणवेश तात्काळ न मिळाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर व्यापक आंदोलन उभारणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी यावेळी दिला.
शिक्षक समितीच्या या आंदोलनास कुडाळ प स चे सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, विस्तार अधिकारी व्ही एस पाटील आदी अधिका-यांनी भेट देत प्रमुख मागण्या शासनला पाठविल्या जातील असे आश्वस्त केले.
तसेच शालेय पोषण आहार योजेनेतील त्रुटींबाबत तालुकास्तरीय शिक्षक संघटना प्रतिनिधी, पोषण आहार ठेकेदार, पंचायत समिती शिक्षण विभाग यांची एकत्रित बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

पोषण आहार बाबतच्या नोटिसंचा निषेध

कुडाळ तालुक्यातील 75 शाळांच्या मुख्याध्यापकांना एक दिवस पोषण आहार ऑनलाईन उपस्थिती भरली नाही म्हणून चुकीच्या पध्दतीने गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या नोटीसांचे आंदोलनात जाहिर निषेध करण्यात आला.

15 मार्च 2024 चा जाचक संचमान्यता आदेश रद्द करा

   शासनाचा दि 15 मार्च 2024 चा संचमान्यता आदेशामुळे कोकण विभागातील ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, आदी जिल्हयांसह महाराष्ट्रातील डोंगरी बहुतांश जिल्हयांची शिक्षक संख्या कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बालकाचा मोफत व सक्तिचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कलम 25 मधील विद्यार्थी शिक्षक प्रमाण म्हणजे संचमान्यता यामध्ये राज्य शासनाला बदल करण्याचा अधिकार नसताना नवीन संचमान्यतेचा जाचक आदेश शासनाने दि.15 मार्च 2024 रोजी निर्गमित केला.सदर आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षक समितीने आंदोलनात केली. 

शिक्षक समितीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

 जिल्हा परिषद शाळांना ऑनलाईन कामांबाबत आवश्यक सोयीसुविधा शासनाने पुरवाव्यात याबाबत कुडाळ शिक्षक समितीकडून मान.उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष शशांक आटक यांनी आंदोलनात दिली.

तर राज्यव्यापी आंदोलन –
कोरगावकर

दरम्यान विद्यार्थ्यांना शालेय गणवेश,जाचक संचमान्यता आदेश रद्द करणे,ऑनलाईन कामातील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात अन्यथा संपूर्ण राज्यभर जन आंदोलन उभारणार असे प्रतिपादन राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिले.

You cannot copy content of this page