पणदूरतिठा येथे १ जानेवारीला विविध कार्यक्रम…!

⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना पणदूरतिठाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवीन वर्षानिमित्त बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी पणदूरतिठा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 10 वाजता श्रींची आरती व तीर्थ प्रसाद, दुपारी 12 ते 3 महाप्रसाद, दुपारी 1 वाजल्यापासून ग्रामस्थांची भजने तसेच सायंकाळी 7 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा शतग्रीव संहार हा नाट्य प्रयोग आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतारी कलावंत सिद्धेश कलिंगण, दादा राणे-कोनसकर, निळकंठ सावंत, राजू हर्याण, राधाकृष्ण नाईक, काका कलिंगण, पप्पू घाडीगावकर, सुनिल खोर्जूवेकर, संजय लाड, अक्षत देसाई यांचा सहभाग असणार आहे. हार्मोनियम सत्यवान गावडे, पखवाज चंद्रकांत खोत व तालरक्षक राजू कलिंगण यांची संगितसाथ मिळणार आहे. सर्वाना उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघटना (पणदूरतिठा)च्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page