कुडाळ लायन्स क्लबतर्फे पर्यटनाला चालना…

वैभव नाईक:लायन्स फेस्टिव्हल मध्ये दुसऱ्या दिवशी नृत्याविष्कार..

⚡कुडाळ ता.३०-: लायन्स क्लब ऑफ कुडाळचे सामाजिक कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे 23 वर्ष महोत्सव घेऊन पर्यटनाला चालना देणारे काम सेवाभावी संस्था लायन्स करीत आहे असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लायन्स फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी केले यादिवशी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
    सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर दिमाखात सुरूवात झाली  दुसऱ्या दिवशी माजी आमदार नाईक यानी भेट दिली त्यांचे लायन्स ज्येष्ठ पदाधिकारी अँड अजित भणगे यानी स्वागत केले यावेळी लायन सीए, सुनील सौदागर लक्ष्मी ज्वेलर्सचे  राहुल पाटणकर, राजू पाटणकर पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम संदीप भोसले गणेश कऱ्हाडकर,अँड श्रीनिवास नाईक लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली, संजीव प्रभू नगरसेवक उदय मांजरेकर राजन नाईक सचिन काळप राजू गवंडे सुशील चिंदरकर मंदार शिरसाट शोभा माने डॉ दिपाली काजरेकर, प्रकाश नेरुरकर  डॉ विवेक पाटणकर,देविका बांदेकर, बाळू अंधारी पल्लवी तारी जी दत्ताराम अनंत शिंदे नयन भणगे स्नेहा नाईक ऍड समीर कुळकर्णी डॉ सुशांता कुळकर्णी डॉ जयंती कुळकर्णी चेतना चुबे रश्मी चव्हाण अस्मिता बांदेकर मेघा सुकी अँड शेखर वैद्य, डॉ अमोघ चुबे,अँड मिहीर भणगे, जीवन बांदेकर शैलेश मुंडये, साईश सामंत कपिल शिरसाट राजन कोरगावकर मंजुनाथ फडके मनोज मठकर  लायन्स, रोटरी क्लबचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकवर्ग उपस्थित होता
  आमदार नाईक म्हणाले लायन्स क्लब या सेवाभावी संस्थेचे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय आहे ही समाजसेवा करतानाच फेस्टिवल महोत्सव घेऊन येथील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम लायन्स क्लब करीत आहे या महोत्सवामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीस लागणार आहे असे सांगून महोत्सवास शुभेच्छा दिल्या
अँड अजित भणगे म्हणाले सिंधुदूर्ग जिल्हा सांस्कृतिक चळवळीची खाण आहे अनेक कलावंत या जिल्ह्यात आहेत या कलावंताच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने गेले दोन दिवस आम्ही स्थानिक कलाकारांचे भरगच्च कार्यक्रम घेतले त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आणि ही कला आपल्या जिल्ह्यासह राज्यात जावी यासाठी स्थानिकांना व्यासपीठ देण्यासाठी आमचा हा प्राधान्याने प्रयत्न असतो असे सांगितले यावेळी  नृत्य क्षेत्रातील कुडाळची सुकन्या जी सध्या पालघर येथे नृत्यसेवा बजावत आहेत अशा प्रीती सावंत,, नृत्यांगना दीक्षा नाईक, आरव आईर आयडियल इंग्लिश स्कूल नेरूर यांचा लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या महोत्सवाला लायन्स क्लब ऑफ मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन महोत्सवास शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन बादल चौधरी अमर प्रभू यानी केले

आज कलांवताची मांदियाळी, नवीन वर्षाचे स्वागत

आज ३१ रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत Countdown Begins 2025″ डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्ट आयोजित केला आहे. या कार्यक्रमात एकत्रितपणे विविध वाद्यकार, गायक आणि नर्तक आपली कला सादर करणार आहेत.  सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुष्का शिकतोडे (सूर नवा ध्यास नवा फेम), धनश्री कोरगावकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम), गणेश मेस्त्री (इंडियन आयडॉल फेम) आणि हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न) यांसारखे प्रतिभावन प्रसिद्ध कलाकार आहेत, जे आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.याशिवाय, उत्कृष्ट अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि कोरियोग्राफर मिनाक्षी पोक्षे यांचे नृत्य सादरीकरण देखील असणार आहेत .३१ डिसेंबरच्या रात्री, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या अद्वितीय महोत्सवात सहभागी व्हा आणि एक अविस्मरणीय अनुभव मिळवा असे लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page