नाशिकच्या राज्य मास्टर गेम क्रीडा स्पर्धेत मालवणच्या स्नुषा सौ क्षमा रेडकर यांची चमकदार कामगिरी…!

⚡मालवण ता.२९:-
नाशिक येथे झालेल्या ५ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम क्रीडा स्पर्धेत मुंबई गोरेगावस्थित मूळ म्हापसा गोवाच्या रहिवाशी सौ क्षमा (वंदना) मधुकर रेडकर यांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार सुवर्णपदक प्राप्त केली आहेत . या स्पर्धेत सौ रेडकर यांना नॅशनल चॅम्पियनशिप देऊन सन्मानित करण्यात आले सौ क्षमा रेडकर या मालवणच्या स्नुषा आहेत

नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. सौ रेडकर यांनी पाच किलोमीटर धावणे, पाच किलोमीटर चालणे, १५०० मीटर्स धावणे तसेच वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केल्याने त्या सुवर्णपदकाच्या मानकरी बनल्या सौ रेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सौ रेडकर या पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्या असून त्या मुंबई पोलीस खात्यात अथलिटिक्सच्या माजी प्रशिक्षक म्ह्णून कामगिरी बजाविली आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

You cannot copy content of this page