कर्नाटक ट्रॉलर्सची घुसखोरी कायम…

रविकिरण तोरसकर यांचा आंदोलनाचा इशारा:मत्स्य विभागला ३१ डिसेंबर २०२४ ची डेडलाईन..

⚡कुडाळ ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधिक्षेत्रात परप्रांतीय लोकांची घुसखोरी वाढल्याने तात्काळ नवीन हायस्पीड गस्ती नौका कारवाईसाठी उपलब्ध करून देण्यात यावी आणि परप्रांतीय नौकांवर तात्काळ करण्यास कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी श्रमिक मच्छीमार संघाच्या वतीने रविकिरण तोरसकर यांनी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांच्याकडे केली होती. परंतु दिलेली मुदत उलटूनसुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने वरील दोन गोष्टींची पूर्तता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत न केल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी दि ०१ जानेवारी २०२५ पासून जिल्ह्यातील व राज्यातील विविध मच्छीमार संघटनाना सोबत घेऊन बेमुदत धरणे आंदोलन मत्स्य कार्यालय, मालवण येथे करण्यात येईल.असा इशारा श्रमिक मच्छीमार संघाच्या वतीने रविकिरण तोरसकर यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री. तोरसकर म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधीक्षेत्रात परप्रांतीय नौकांचा धुडगूस वाढला असून याबाबत स्थानिक मच्छीमार यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. विशेषतः कर्नाटक मलपी येथील हाय स्पीड बोटिचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे .सदर विषयात मी दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. सदरचे उपोषण मागे घेताना आपल्या कार्यालयाने सदरच्या विषयात तातडीने कारवाई व्हावी यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे जावक क्रमांक मत्स्य /स/आ /म/ सिं-मा तां/११/८०४५/२०२४ या जावक क्रमांकाने
१) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधिक्षेत्रात परप्रांतीय लोकांची घुसखोरी वाढल्याने तात्काळ नवीन हायस्पीड गस्ती नौका कारवाईसाठी उपलब्ध करून देण्यात यावी अथवा सद्यस्थितीत लगतच्या जिल्ह्यातून हाय स्पीड गस्ती नौका उपलब्ध करून द्यावी
२) परप्रांतीय नौकांवर तात्काळ करण्यास कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी केली होती .
तसेच खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्य आयुक्त अतुल पाटणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरील विषयाबाबत तातडीने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली होती. यावर आयुक्त अतुल पाटणे यांनी दहा दिवसांमध्ये सदर गोष्टींची पूर्तता करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन नारायण राणे यांना दिले होते.
परंतु दिनांक २६/१०/२०२४ पासून आज तगयत म्हणजेच गेल्या दीड महिन्यामध्ये मत्स्य व्यवसाय खात्याने संबंधित विषयात कोणतीही पावले उचलली नाहीत असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे परप्रांतीय विषेतः कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर ची बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. त्यामुळे सागरी जैवविविधता व स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर विषयात मत्स्यव्यवसाय विभागाने वरील दोन गोष्टींची पूर्तता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत न केल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी दि ०१ जानेवारी २०२५ पासून जिल्ह्यातील व राज्यातील विविध मच्छीमार संघटना ना सोबत घेऊन बेमुदत धरणे आंदोलन मत्स्य कार्यालय ,मालवण येथे करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास सदर आंदोलनाचे बेमुदत उपोषण आंदोलनात रूपांतर करण्यात येईल. तरी मत्स्यव्यवसाय विभागाने कार्यालयाने सदर विषयात तातडीची पावले उचलावीत असा इशारा श्री. तोरसकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page