शिवडाव आरोग्य उपकेंद्राला विकास तांबेंकडून वॉटर कूलर सुपूर्द…

*💫मालवण दि.१८-:* शिवडाव बौद्धवाडी येथील सम्यक समाज प्रबोधिनी मंडळाचे सहसचिव विकास यशवंत तांबे यांच्याकडून कालकथित नित्यानंद नागाजी तांबे यांच्या स्मरणार्थ शिवडाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे स्वच्छ थंड आणि गरम पाण्याची व्यवस्था होण्यासाठी इलेक्ट्रिक वॉटर कूलर सुपूर्द करण्यात आला. उपकेंद्रात येणाऱ्या पंचक्रोशीतील रुग्णांना पाण्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवडावचे तंटामुक्ती अध्यक्ष रविकांत सावंत आरोग्य सेविका के. बी. दळवी, ए. आर. तेली, आरोग्य सेवक डी. बी. सुर्वे, मदतनीस व्ही. आर. मळये, ग्रामसेवक एस. पी. केदार, शिपाई महादेव भिसे यांच्यासह सम्यक समाज प्रबोधिनीचे अध्यक्ष दिनेश तांबे, उपाध्यक्ष सुनिल तांबे, सल्लागार अविनाश तांबे, प्रकाश तांबे, सरचिटणीस सचिन पवार, सहसचिव अमित तांबे, कार्यकारिणी सदस्य मनेश तांबे, संतोष तांबे, धोंडी तांबे, तेजस तांबे आदी सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page