आंबोली,ता.१० : राघवेश्वर येथे परम पूज्य श्री.भारतदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा कालपासून सुरु झाला असून आज २४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. येथील राघवेश्वर येथील प.पू.भारतदास महाराजांच्या पुण्यभूमीत मठात कालपासून (ता.९)कार्यक्रम सुरु झालेत.त्यांचे भक्तगन कोल्हापूर,सांगली, सातारा ,बेळगाव,सिमधुदुर्ग,ठाणे,मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात.पुण्यतिथी निमित्त भाविकांनीही गर्दी केली आहे.भजन कीर्तन कालपासून सुरु आहे.आज अभिषेक,तसेच विविध धार्मिक विधी सोहळा होणार आहे.तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतदास महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष पुंडलिक गावडे, मंगेश नाटलेकर, श्री चव्हाण महाराज, दिलीप गावडे,नारायण कोरगावकर, शंकर
पार्सेकर,बाळासाहेब माळी,रमेश गावडे,प्रसाद मेस्त्री,अनिल मेस्त्री,संतोष राऊत, दादा तवटे, गणपत पाटील आदिनी केले आहे.
आंबोली राघवेश्वर येथे आज प.पू.भारतदास महाराज पुण्यतिथी सोहळा…
