सलग नऊ वेळा आमदार होण्याचा विक्रम: मालवणात आनंदोत्सव
⚡मालवण ता.०६-:
मालवणचे सुपुत्र आणि वडाळा नायगाव मुंबईचे आमदार कालिदास कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली आहे
राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळयात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदि उपस्थित होते
मालवण रेवतळे येथील रहिवासी असणारे कालिदास नीळकंठ कोळंबकर हे सलगपणे नऊवेळा एकाच मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले असून नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहे
१३ नोव्हेंबर १९५३ साली कोळंबकर यांचा जन्म झाला. सध्या ते ७१ वर्षीय आहेत. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना दोन मुलगे आहेत. १९९० पासून २००४ पर्यंत कोळंबकर यांनी शिवसेनेतून निवडणूक पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. तेव्हापासून त्यांनी २०२४ पर्यंत ते सलग निवडून आले आहेत. २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. राणे यांच्याबरोबर कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा पोटनिवडणुकीत ते निवडून आले २००६ ते २०१४ या काळात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी कग्रेिसच्या तिकिटावर निवडणूक
जिंकली आणि मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही कोळंबकर यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याविरुद्ध ८०० मतांनी निसटता विजय मिळविला. नंतर कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून २०१९ मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली होती. तर २०२४ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते पुन्हा निवडून आले. सर्वसामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्याचा प्रवास आहे.
नऊवेळा आमदार होण्याचा बहुमान कालिदास कोळंबकर यांच्या बरोबरच दिलीप वळसे-पाटील या दोघांना मिळाला आहे या दोघांचीही ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे
