मालवण तालुकास्तरीय आयोजीत वाचक स्पर्धेमध्ये योगेश मुणगेकर प्रथम…!

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील नगर वाचन मंदिर यांच्यावतीने साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये योगेश रविंद्र मुणगेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

स्पर्धा आज ग्रंथालयाच्या सभागृहात झाली. व्यासपीठावर स्पर्धेचे परिक्षक विनायक कोळंबकर व संग्राम कासले व कार्यवाह नागेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वती आणि जयवंत दळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रास्ताविक ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.

या स्पर्धेत अक्षता किशोर कुबल हिने द्वितीय, रिया एकनाथ घाडीगावकर हिने तृतीय क्रमांक तर साई संतोष चव्हाण हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन आलेल्या स्पर्धकांना ८ डिसेंबरला रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय मध्ये होणाऱ्या जिल्हास्तरिय वाचक स्पर्धेत थेट सहभाग मिळाला आहे.

संजय शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page