⚡बांदा ता.०६-: येथील नट वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, प्रवीण परब, सौ. स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब यांच्यासह वाचक उपस्थित होते.
यावेळी अनंत भाटे यांनी डॉ. आंबेडकर यांचय्याविषयी मनोगत व्यक्त केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
नट वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिन साजरा…
