पालघरमधील आदिवासी पाड्यातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡मालवण ता.०६:- मुंबई कांजूरमार्ग पूर्व येथील ‘एक सेवाभावी संस्था’ या संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये बालदिन साजरा करण्यात आला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिलोंडा (चिंचपाडा) आणि चांभारशेत या आदिवासी पाड्यांमधील शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ व फराळचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला शशांक मंचेकर, गणेश गांगले व राजेश कर यांचे विशेष सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page