नगरपालिकेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
*💫कणकवली दि.१८-:* कणकवलीत लॉकडाऊन च्या चौथ्या दिवशी रविवारी बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता.शहरातील व्यापाऱ्यांनी नगरपंचायत च्या आवाहनाला प्रतिसाद देत मेडिकल स्टोअर्स, दूध, वृत्तपत्रे वगळता अन्य अत्यावश्यक दुकाने बंद ठेवली होती. पटवर्धन चौकात आरोग्य विभागाच्या वतीने थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. संशयित आढळल्यास तात्काळ त्याची चौकातच रॅपिड टेस्ट केली जात आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि प्राथमिक शिक्षक यांचे संयुक्त आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. रॅपिड टेस्टमध्ये यापुढेही सातत्य ठेवण्यात येणार आहे. पटवर्धन चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संचारबंदीचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
