विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कार्रवाई…

दोडामार्गमध्ये वाहन चालकांचे धाबे दणाणले

*💫दोडामार्ग दि.१८ सुमित दळवी-:* राज्यात संपूर्ण संचारबंदी चालू असताना दोडामार्ग मध्ये संचारबंदीचे उल्लंघन करत गाड्या घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांवर दोडामार्ग पोलिसांनी कडक कारवाई करत दंड वसूल केला आहे.यामुळे विनाकामाचा आणि विनाकागद पत्रांसह गाडी चालवणाऱ्या चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध जारी केल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची सर्व आस्थापने बंद आहेत. संचारबंदी असूनही काही जण बाजारपेठेत उगाच फिरतात ही गोष्ट लक्षात येताच दोडामार्ग पोलिस निरीक्षक महेंद्र घाग सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व होमगार्ड कडक कारवाई करताना दिसून येत आहेत.

You cannot copy content of this page