रुग्ण वाढीमुळे ताण वाढत असल्याने संजू विरनोडकर टीमचे आवाहन_
💫 *सावंतवाडी* :- सावंतवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर टिमचे कोरोना प्रतिबंधक कार्य सावंतवाडी शहरात व आजूबाजूच्या परिसरात जोमाने सुरू असून,शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या भागात निर्जंतुककीरण करण्यात येत आहे.या उपक्रमात संतोष तळवणेकर तुषार बांदेकर सागरमळगावकर,आकाशमराठे,श्रीकांत कुडपे,प्रशांत मडगावकर,विश्वनाथ पास्ते व नागरिकानी आणि सहभाग घेतला तर आकेरी,कुडाळ शहर येथेदेखील कोरोना बाधितांच्या घरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यास नागरिकांनी अचानक बोलवणे न करता एकदिवस अगोदर कळवावे अशी विनंती या टिममार्फत करण्यात आली असून त्यासाठी 9665662662किंवा 9403369103 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
