⚡सावंतवाडी ता.१६-: महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचार करण्याचा आदेश पक्षाकडून असताना देखील विरोधी उमेदवाराचे काम करत पक्षाचे आदेश डावल्याने बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी आज अमित परब, समीर गावडे, नितीन राऊळ यांची भाजप पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज दिली.