राजन तेलींचा आरोप;नुसत्या इमारती उभ्या करून काय साध्य करणार…
सावंतवाडी
गेली पंधरा वर्षे विकासाचे गमजा मारणारे मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदार संघातील आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुचकामी ठरले आहे त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीत येथील जनतेला गोवा बांबुळी किंवा कोल्हापूरची वाट धरावी लागत आहे त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी आता बदल करण्याची तयारी ठेवावी व आपल्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले आहे.
दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघात फक्त हॉस्पिटलच्या इमारती उभ्या केल्या आहेत मात्र त्या ठिकाणी कोणतेही तज्ञ डॉक्टर नाही तर सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा जागेच्या प्रश्नावरून प्रलंबित आहे दोन वेळा भूमिपूजन होऊन सुद्धा हा प्रश्न रेंगाळला आहे त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला आहे.
निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना श्री तेली यांनी केसरकर यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार केसरकर यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून नेहमी तेथील जनतेला उल्लू बनवण्याचे काम केले प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतेही सकारात्मक धोरण आरोग्यासाठी त्यांनी तयार केलेले नाही सावंतवाडी शहराचा प्रश्न लक्षात घेता या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेली सात वर्षे तसेच रेंगाळून ठेवले आहे.वेत्ये येथे पर्यायी जागा मिळत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला नाही त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे
दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथे हॉस्पिटलच्या फक्त इमारती उभ्या केल्या मात्र त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर नाहीत त्यामुळे फक्त इमारती उभ्या करून उपयोग काय असा सवाल त्यांनी केला आहे.
ही सर्व परिस्थितीबद्दल काळाची गरज आहे अन्यथा आपत्कालीन परिस्थितीत आम्हाला गोवा बांबुळीशर अवलंबून राहावे लागणार आहे त्यामुळे ही परिस्थिती बदलली काळाची गरज आहे अन्यथा येणारी पिढी आम्हाला कदापी माफ करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे