⚡देवगड ता.१४-: श्री. स.ह.केळकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती उपक्रम राबविण्यात आला. मा. सुरेंद्र कांबळे नायब तहसिलदार देवगड व मा.अभिजीत शेठ निवासी नायब तहसिलदार देवगड व मा.प्रदिप कदम यांची उपस्थिती होती. मा. प्रदीप कदम यांनी लोकशाहीची प्रक्रिया, मतदानाचे महत्व, मतदार नाव नोंदणी, व स्थानिक स्वराज्य संस्था विधीमंडळ याबद्दल माहिती दिली. मा. सुरेंद्र कांबळे यांनी मतदार यादीत नाव नोंदणे, कमी करणे, कोणकोणत्या कामासाठी मतदार कार्डाचे महत्त्व. महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. श्रीकांत शिरसाठे यांनी लोकशाहीत नागरिकांना हक्काचे महत्व, व राज्यघटनेने जे मुलभूत हक्क व जबाबदाऱ्या दिल्या आहेत ते नागरिकांनी बजावली पाहिजेत असे नमूद केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य मा.विजयकुमार कुनूरे यांनी भुषविले. मा.उपप्राचार्य प्रा. श्रीकांत शिरसाठे यांनी मार्गदर्शन केले. आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रमुख डॉ सी. डी. भेंकी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ.एस.बी.तायडे यांनी केले. सर्वात शेवटी एन.एस.एस. प्रमुख डॉ. एन एम वनखेडे यांनी केले.
