गेल्या 15 वर्षात स्थानिक आमदाराने एखादी शासकीय शैक्षणिक सुविधा का उभारली नाही…?

अर्चना घारे:जनतेने एक संधी द्यावी, या मतदारसंघात शैक्षणिक सुविधा आणि कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार…

⚡सावंतवाडी ता.१४-: विधानसभा मतदारसंघात उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने येथील गोर गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. खाजगी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याचे शुल्क भरण्या एवढी आर्थिक परिस्थिती येथील पालकांची नाही. गेल्या 15 वर्षात येथील स्थानिक आमदाराने एखादी शासकीय शैक्षणिक सुविधा का उभारली नाही. असा सवाल आज अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आमदार दीपक केसरकर यांना केला आहे.

यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की, गेली अडीच वर्ष दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री आहेत. मग त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती का नाही बद्दली.येथे काही शाळांमध्ये एकच शिक्षक चार – चार वर्ग सांभाळत आहेत. तर येथील स्थानिक डी एड व बी एड धारक शेकडो शिक्षक बेरोजगार आहेत. त्यांना या ठिकाणी का नियुक्त्या देऊ शकले नाहीत. याचा जाब त्यांनी द्यावा. गेल्या अडीच वर्षात दीपक केसरकर यांनी शिक्षणक्षेत्राची वाट लावली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

यावेळी येथील जनतेने आपल्याला एक संधी द्यावी आपण या मतदारसंघात शैक्षणिक सुविधा आणि कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार असे आश्वासन अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आज दिले आहे.

You cannot copy content of this page