केसरकरांना काही गावातून जनतेने परतून लावलं; त्यामुळे त्यांचा पराभव हा आता जग जाहीर…

अर्चना घारे: २००९ मध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना प्रवीण भोसले यांनी बंडखोरी का केली..? तर राजन तेलींना देवेंद्र फडणवीस यांनीच महाविकास आघाडी मधून उभ केलय..

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्याबाबत प्रचंड नाराजी असून, गावागावातून लोक त्यांना परतवून लावत आहेत.त्यामुळे आता दीपक केसरकर यांनी कितीही धनशक्तीचा वापर केला तरी केसरकरांचा पराभव निश्चित आहे. अशी टीका अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी केली.

यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवार यांनी वेळोवेळी प्रविण भोसले यांना उमेदवारी दिली होती. परंतु, 2009 साली ती उमेदवारी दुसऱ्याला दिल्यावर तेव्हा तुम्ही बंडखोरी कून अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली? असा सवाल देखील उपस्थीत केला. त्यामुळे प्रविण भोसले यांना माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे देखील स्पष्ट केले.

गेल्या पंधरा वर्षांत केसरकर यांनी केवळ घोषणा केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या हातून काहीच घडलेले दिसत नाही. त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्या बाबत प्रचंड असंतोष गावागावातून दिसून येत आहे. गेली 10 वर्ष मी या मतदारसंघात काम करत असून, येथील जनतेला होत असलेला त्रास मी पाहिला आहे. त्यामुळे येथील जनतेचा मला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे यावेळी नक्कीच परिवर्तन घडेल असा विश्वास देखील व्यक्त केला.

यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की , सद्य स्थितीत एक ऑडियो क्लिप सोशल मीडियावर फिरत असून, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून खुद्द माजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनीच उभे केले असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

यावेळी अद्याप पर्यंत तरी कोणीही माझ्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली नसून, 23 तारीख नंतरही मी महाविकास आघाडी मधून काम करताना दिसणार आहे. तर निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतले होते. असे स्पष्ट केले आहे.

यावेळी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, नियाज शेख, बावतीस फर्नांडिस, याकुब शेख, संजय भाईप, आसिफ शेख, विनायक परब, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, अवधूत मराठे, साबाजी रेडकर, निलेश गावडे, नोबर्ट माडतीस, पंढरी राऊळ, मारिता फर्नांडिस, पूजा दळवी, गौरी गावडे, नीतीशा नाईक, सुधा सावंत, सुनिता भाई, श्रिया सावंत, अलिषा पेडणेकर, दिपाली मुळीक, सुमित्रा मुळीक, रविकिरण गवस, अमोल दळवी, प्रसाद दळवी, विनायक परब, मयूर कामत, वैभव परब, तनु शेख, समीर मुल्ला, नितीन परब, सदानंद मुळीक चंद्रशेखर परब, प्रसाद परब, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page