उध्दव ठाकरे यांच्या गदारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ…

भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांची जोरदार टीका…

वैभववाडी प्रतिनिधी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनादेश हा महायुतीच्या बाजूने होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. हिंदुत्वाला मूठमाती देत काँग्रेसशी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांच्या गद्दारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला. अशी टीका भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी वैभववाडी येथे केली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना या मतदारसंघातून 60 हजार मतांचे मताधिक्य द्या. जिल्ह्याला यापुढे बाहेरून पालकमंत्री आणावा लागणार नाही. पालकमंत्री आपलाच असेल असा विश्वास ही विनोद तावडे यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी येथे जाहीर प्रचार सभेत विनोद तावडे बोलत होते.
केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ जवळपास 60 टक्के जनतेला मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आज सुरू आहेत. यातील अनेक योजनांचे लाभार्थी विरोधक राहुल गांधी देखील आहेत.
विनोद तावडे यांनी केंद्र शासनाच्या अनेक योजनांची यादीच वाचून दाखवली. 18 कोटी जनतेला आज मोफत धान्य, 1 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस, 25 कोटी कुटुंबं आज दारिद्र्य रेषेतून बाहेर आली आहेत. असे सांगितले.
तावडे यांनी संजय राजाराम राऊत यांच्यावर टीका केली. सकाळी उठून वातावरण बिघडवण्याचे काम राऊत करत आहेत. त्याला तोडीस तोड उत्तर भाजपा प्रवक्ते नितेश राणे हे देत आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला हात दिला. त्यामुळे त्यांना सोनिया गांधींना सलाम करावा लागत आहे. परंतु मर्द मावळा एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा गहाण ठेवलेला धनुष्यबाण काँग्रेस कडून बाहेर काढला. आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. या निवडणुकीत देखील महायुतीचे सरकार राज्यात येणार आहे. आमदार नितेश राणे हे 50 ते 60 हजार मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page