महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या…

अर्चना घारे परब यांचे भावनिक आवाहन…

सावंतवाडी ता.१२-:

अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब ह्या मतदारसंघातील विविध गावात जाऊन आपला प्रचार करत असून, त्या त्या गावातील समस्या जाणून घेत आहेत. आज त्या सातुळी गावात गेल्या असता, तेथील महिलांशी त्यांनी संवाद साधला यावेळी महिलांकडून त्यांना गावात उद्भवत असलेल्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधले, यावेळी आपल्या या समस्या सोडविण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची एक संधी आपणाला द्यावी असे भावनिक आवाहन त्यांनी महिलांना केले.

यावेळी तेथे उपस्थित महिलांनी गावात चांगले रस्ते नाहीत, तसेच दळण वळणाच्या समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शैक्षणिक समस्या या सारख्या विविध समस्यांवर लक्ष वेधले, यावेळी तेथील महिलांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. हे पाहून अर्चना घारे परब यांना देखील अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

You cannot copy content of this page